Asset side:

  • Posts 134
  • Comments 118
  • Words in Posts 19,774
  • Words in Pages 947
  • Words in Comments 1,549

> Visits:

Visits So far..

Archives

Clocky: Clock Widget

Get Adobe Flash player Wordpress Plugin By California Accountant
?
PageRank

देवकीनंदन

अनादि अनंत तोचि आहे

निर्गुण अन निराकार

रंध्रा सत्वात तोचि उरला

शंभर त्याचे गुणाकार

.

त्याची कोटी लाख किरणे

कृपेचे किती प्रकार

त्याच्या स्मरणाने होती

उजळ मनाचे अंधार

.

त्याचे नाव आशा जीवन

तो वीणेचा झंकार

त्याचे खरेच हात हजारो

आपुला फक्त स्वीकार

.

त्याचे कोणी भक्त सखे ते

कोणी कीर्तनकार

आतून प्रगटे मैत्र आगळे

दुर्लभ साक्षात्कार

.

त्याच्या आशा, त्याचीच आशा

त्यालाच हा पुकार

ह्र्दयी घे रे देवकीनंदना,

जपतो कोटि ऒंकार

.

ह्र्दयी घे रे देवकीनंदना,

जपतो कोटि ऒंकार

 

– योगेश ज जोशी

1 comment to देवकीनंदन

  • प्राची

    त्याच्या आशा, त्याचीच आशा
    त्यालाच हा पुकार
    ह्र्दयी घे रे देवकीनंदना,
    जपतो कोटि ऒंकार

    I wish..i could have written this..
    it’s very very pure…too good.

Leave a Reply

 

 

 

You can use these HTML tags

<a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>