Asset side:

  • Posts 134
  • Comments 118
  • Words in Posts 19,774
  • Words in Pages 947
  • Words in Comments 1,549

> Visits:

Visits So far..

Archives

Clocky: Clock Widget

Get Adobe Flash player Wordpress Plugin By California Accountant
?
PageRank

सगळे तुझेच..

———————————————

पापणीच्या पालवापासून

आकाशाच्या शेवटच्या रेषेपर्यंत

.

कुणी कुणी नसताना,

तू आलीस….

.

घेऊन आलीस येताना,

ओंजळभर ढग..

.

कधी त्यांना वितळवताना मग

वीजही तूच झालीस

.

त्यातून तूच बरसलीस जेव्हा शिवारभर ओल्या मातीपर्यंत

तेव्हा माझ्या ओलसर झालेल्या मनगटांवरचे तुषार ही तूच होतीस

.

अनोळखी वाटेपलीकडच्या इंद्रधनुष्यातही मग तुझेच रंग दिसले

अन ओल्या काळ्याशार मातीचा वासासकटचा वारसा ही तुझाच होता

.

तूच घेऊन आलीस मग

नात्यातून एक सुंदर पोपटी कोवळं रोप

.

वादळत्या उन्हापावसाच्या खेळात, माझे पाय पाषाण झाल्यावर,

त्या रोपाला गोंजारणारे हात ही तुझेच होते

.

तूच झालीस मग तो एक सुंदर पारिजातकाचा हुंकार

.

दैवी अंकुरांच्या त्या रात्रीही तुझ्याच होत्या

अन पानगळीच्या शूर लढायाही तूच तिथे खेळलीस

.

त्या अबोल झाडातून जेव्हा मग पहाटे तू हळूवार डोकावलीस

अन बरसलीस होऊन शेकडो शेकडो शुभ्रफुलांचा सडा

.

तेव्हा माझे अस्तित्व,

लक्षावधी डोळे होऊन,

केशरांच्या देठांनी,

पहात राहिले,

.

तुझा उत्सव…

.

मी चकित, मी स्तिमित…

मी फक्त भाग्यवान…!

.

तुझ्याच….सगळ्या उत्सवांचा

एक नशीबवान साक्षीदार…

————————————————

4 comments to सगळे तुझेच..

Leave a Reply

 

 

 

You can use these HTML tags

<a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>