मन-कव-डा तू
अन कसा केवढा तू
माझी रुपेरी तेवढीच रात
माझा जेवढा तू
पोपटी हिरवळ
रानोमाळ दरवळ
आत आतल्या पानांचा
गंधित केवडा तू ————— १
कोवळी उन्हं
मोहरलं जिणं
घोर उन्हामध्ये ही
छाये एवढा तू ——————२
मन-कव-डा तू
अन कसा केवढा तू
माझी रुपेरी तेवढीच रात
माझा जेवढा तू
- योगेश ज जोशी


Recent Comments