Asset side:

  • Posts 134
  • Comments 118
  • Words in Posts 19,774
  • Words in Pages 947
  • Words in Comments 1,549

> Visits:

Visits So far..

Archives

Clocky: Clock Widget

Get Adobe Flash player Wordpress Plugin By California Accountant
?
PageRank

विरून जाताना

ही गजल उरूदे मागे, मी विरुन जाताना
भले न भरतील डोळे, मन भरून जाताना

  

जे नडले मजला नेहमी, जगण्याच्यावेळी
मी शोक बघितला त्यांचा, मरुन जाताना

  

उद्दाम भाषा गेली उखडून महापुरामध्ये
ते पान होते नम्र झाले, तरून जाताना

  

धावले ते यशासाठी, घटका अन पळांच्या
जन्म मी समोर पाहिला; सरून जाताना

  

भान मलाही नाही उरले समर्पणाच्या रात्री
पाय तुझाही नाही अडला विस्मरुन जाताना

  

अर्थांचेच घोट घेतले, अर्थांचीच नशा आली
अर्थाचेच कण्हणे ऐकले, शब्द चिरुन जाताना

  

ही गजल उरूदे मागे, मी विरुन जाताना
भले न भरतील डोळे, मन भरून जाताना


- योगेश ज जोशी

1 comment to विरून जाताना

Leave a Reply

 

 

 

You can use these HTML tags

<a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>