राजकुमार
मरणा आधी
पालवी नंतर;
डोळ्यांपाशी
चाफा फुलवत;
भुलवणारे
अत्तर घेऊन..
अश्व साथीने
त्या देशातून..
हळुच हळव्या
मखमलीतल्या-
किनऱ्या बुजऱ्या
सुखा सोबत
नात्यांना त्या
नाते करुनी
प्रिया बांवरी
हे ही स्मरुनी
भान जाणीव
अल्लद करण्या
उनाड जिवाला
शाश्वत करण्या
या अस्तित्वाला
जगणे करण्या
येशील?
येणारेस?
- योगेश ज जोशी


hi yogesh,
accidentally ya website var pochlo..kavita aavadli..
suresh