…………………………………….
तुझी कामं..
छोटी… मोठी…
उगाचच मी… ओढवलेली
.
क्षुल्लक शंका
विचारलेल्या
उगीचच तुला… हाकारलेल्या
.
अस्पष्ट कारणं
भेटींमागची
मुद्दाम ओढून…आणवलेली
.
तुझे अभिप्राय
मागितलेले
नकळत मला… बदलवणारे
.
कधी तुझे हसणे
खरे…खोटे
मन तेवढे…हरखणारे
.
.
.
छोटे, मोठे,
खरे, खोटे,
पुसट, क्षुल्लक
भेट, कारण
.
या सगळ्याहून दूर..
.
ठळक…
.
निखळ, निश्चित आणि संयत…
.
माझे प्रेम…!
.
तुझ्यासाठी…!
.
- योगेश ज जोशी


this is smily kavita. I mean it brings a long smile on ur face when u reach the end
waw nice one……………….gr8888888888888888888888
khup chan kavita ahe, a cute one n obviously with lots of love in it………………. Will love to read more of this kind
this is smily kavita. I mean it brings a long smile on ur face when u reach the end