Many Things....Single Tab!

नवे नाटक : “काटकोन त्रिकोण”
गेल्या एक-दोन वर्षात पुन्हा एकदा अनेक नाटके प्रायोगिक रंगभूमीवरून सुरुवात करुन व्यावसायिकतेची पायरी ओलांडत आहेत. व्हाईट लिली व नाईट रायडर, माकडाच्या हाती शॅंपेन, इ याची लक्षणीय उदाहरणे आहेत. याच माळेतले काटकोन त्रिकोण हे नवे नाटक अनेक आघाड्यांवर पकड घेते.

जरी प्रायोगिकतेचा वारसा असला तरी नाटकाचा विषय अगदी सरळ कौंटुंबिक आहे. जरा वेगळ्या प्रकारे लिहिले असते तर हे नाटक सर्वमान्य ’फॅमिली कॉमेडी’ म्हणूनही अगदी शोभले असते. पण नाटकाचे वैशिष्ट्य आहे तो त्याच्या मांडणीत व संवादात.

पेशाने वकील असणारा राहुल, त्याची प्रोफेसर बायको भक्ती व तिचे सासरे आबा यांच्यातला हा नातेसंबंधांच्या गुंतागुंतीचा त्रिकोण आहे. अर्थात त्याला सस्पेन्सची जोड ही देण्यात आलेली आहे.  हा सस्पेन्स सोडवण्यासाठी घरात आलेले इन्स्पेक्टर बापट या गुंत्याचे सगळे पदर उलगडून दाखवण्यात छान सहाय्यभूत होतात. नाटकाची सुरुवातच फ्लॅशबॅकने होते. आणि अनेक वेळा भूत आणि वर्तमानकाळातील घटनांमधून प्रवास करत कथानक सुटे होत जाते.

नाटकाचा सस्पेन्स सांगण्यात काहीच मतलब नाही. परंतु एक अपघात आणि त्याभोवती फिरत राहणारे रहस्य हे नाटकाच्या कौंटुंबिक विषयावर व त्यामागच्या आशयावर वरचढ होत नाही हे महत्वाचे. लेखकाला यातून नातेसंबंधच मांडाय़चे आहेत हे शेवटपर्यंत पोहोचते.

खटकेबाज आणि थेट संवाद हे नाटकाचे बलस्थान आहे. जुन्या पिढीच्या नाटकांची आठवण व्हावी इतपत टाळी घेणारे आणि परिणामकारक संवाद नाटकात आहेत. अनेक वेळेला संवादात इतका थेटपणा आणि वेग आहे की मागच्या वाक्याचा परिणाम पुसेपर्यंत पुढचा टोला येतो. त्यामुळे नाटक विलक्षण रंजक झाले आहे.

संवादांइतकेच अभिनय हा ही जमेचीच बाजू म्हणावा लागेल. इ. बापट आणि आबा अशी दोन्ही पात्रे निभावणारे डॉ. मोहन आगाशे यांना पाहणे म्हणजे खरेच ’ट्रीट’ आहे. घाशीराम ते वळू व्हाया सुभाष घईचा त्रिमुर्ती इ इ समर्थ अभिनय प्रवास असणाऱ्या डॉ. आगाशेंनी दोन्ही भूमिका पेलल्याच शिवाय वाचिक अभिनयाचा एक छान दाखला ही नवीन पिढीला दिला आहे. या नाटकाची अजून एक भेट म्हणजे केतकी थत्ते. गेली काही वर्षे विविध अशाच आशयपूर्ण भूमिकांमधून चमकणारी ही अभिनेत्री या नाटकाने खरोखर "अराइव्ह्ड." संवाद, वावर आणि देहबोली या सर्वच आघाड्यांवर तिने पक्के व्यावसायिक मापदंड उभे करणारे काम केले आहे. डॉ. विवेक बेळेंचा राहूलही ठीक. संवादफेक व आवाजाची पट्टी या बाबतीत सुधारणेला वाव. अर्थात नाटक बघताना हे संवाद यांनी लिहिलेले आहेत याचे कौतुक मनात जास्त वेळा डोकावते. त्याबाबतीत संवाद हे नाटकाचे अजून एक पात्रच बनलेले आहे असे म्हणावे लागेल.

गिरीश जोशी यांनी दिग्दर्शन व नेपथ्य या दोन्ही जबाबदाऱ्या छान पेलल्या आहेत. अर्थात चांगले कलाकार व चांगले लेखन / संवाद यामुळे दिग्दर्शनाचे काम अगदीच सोपे झाले असावे असे वाटते. त्यांनी दिलेले नेपथ्य मात्र अगदी उत्कृष्ट. पूर्वीची दिवाणखान्यातील नाटके आता फ्लॅटच्या लिविंग रूम मधली झाली आहेत. त्या दृष्टीने नेपथ्य छान. विशेषत: खरे मासे असलेले ऍक्वेरियम रंगमंच अधिक जिवंत करते.

नाटक अर्थातच नातेसंबंधांवर भाष्य करते पण उत्तरे देत नाही. तशी उत्तरे नसतातच. पण इ. बापटांच्या माध्यमातून प्रत्येक कोनाची बाजू समोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न होतो. आणि प्रेक्षक त्यात रंगून जातात.

अर्थात नाटकात काही उणीवाही जाणवतात. मध्यंतरापूर्वी भक्तीच्या संवादांमुळे नाटक अधिक शब्दबंबाळ वाटते. तसेच, वडील आणि मुलगा, तसेच मुलगा इन्स्पेक्टर यांचे दारू पिणे इतके आवश्यक असते का? सगळा महाराष्टच दारूमय होत असताना समंजस मराठी नाटकांनी तरी दिवाणखान्यातील दारू प्रतिष्ठेची बनवू नये अशी आशा आहे. तसेच नाटकात प्रत्यक्ष घटना कमी व वाद-प्रतिवाद खूप असल्याने काही प्रेक्षकांना ही सगळी नुसतीच थिअरी वाटू लागेल.

पण तरीही अभिनय व संवादांसाठी म्हणून; नाटकवेड्यांसाठी "मस्ट सी" आणि रसिक प्रेक्षकांसाठीही "पाहू शकतो, उत्तम आहे" या आसपासचा हा त्रिकोण नक्की आहे.

"लॉ कॉलेज रोड ने म्हंजे कायद्याच्या मार्गाने फार गेलात की पुढे खिंड लागते, लक्षात ठेवा", "आई, बायको आणि सून यांना प्रत्येकी २५ वर्षे घाबरण्यात आमचे आयुष्य जाते आणि तरी म्हणे पुरुषप्रधान संस्कृती" अशी जोरदार वाक्ये ऐकायला आणि "मुला, मी तुला हे पटवून देऊ शकत नाही कारण मी विचार जास्त आणि प्रेम कमी करु शकत नाही" या सारखे मृदू संवाद ऐकायला हे नाटक एकदा जरूर पहावे.

तर कसं?
इतकं सगळं खणून
मातीखालचं सोनं
त्यांना दिलं नाही
तर कसं?

रेशीम धागा विणून
गोबरा पायमोजा
पायी घातला नाही
तर कसं?

ऊन तापलं जाणून
माठाचं ओगराळं
ओणवं केलं नाही
तर कसं?

दूरचा निरोप आणून
भिजलेलं पत्र
डोळ्यांनी वाचलं नाही
तर कसं?

सगळं गाणं म्हणून
एकटं आणि गर्दीत
तिलाच पोचलं नाही
तर कसं?

- योगेश ज जोशी

शाळकरी
मूठभर चिंचोक्यांवर
तळवे ठेवून
माझी पुन्हा
ओळखा पाहू ची कसरत

दिवे लागल्यावर
घरात येताना
मनाच्या जिन्यात
मीच सुसाट घसरत

हातावरली धूळ
फुटलेले गुडघे
काळेनिळे अपमान
बरेचसे आले विसरत

पुन्हा दिवस
पुन्हा तो रस्ता
मीच खेळ घेऊन नवा
पुन्हा माझे हात पसरत

- योगेश ज जोशी

तो
कलत्या दिवसाची किरणे जेव्हा, करडे ढग कातरतात

सगळे बंध झुगारुन

त्याची गाणी

माझ्यात उतरतात

स्वस्थ जीवन

स्वस्थ रस्ते

स्वस्थच वारे सगळे जेव्हा, मन अस्वस्थ करतात

पापणी ओलांडून

त्याच्या आशा

माझ्या गाली वाहतात

एवढंसं मन

त्यातच तूफान

एकच तहान ती घेऊन जेव्हा जाणिवा हुंकारतात

कुंपण मोडून

त्याच्या वाटा

माझ्या पायात येतात

- योगेश ज जोशी

घट्ट प्रेम
हातांमध्ध्ये हात
बंध गळती लाजेचे
गच्च दाटल्या ढगांना
स्वप्न पडे विजेचे

डोळ्यांमध्ध्ये डोळे
भिती गेलीच मिटून
खूण पटली तिथली
याद आली जिथून

बोटांमध्ध्ये बोटे
सगळे सगळे सांगत
हट्टी प्रेम साजण वेळी
शरण जाई रांगत

मिठीमध्ध्ये मिठी
किती मोहोर उमलले
या केशर कैरी साठी
सारे ऊन हे झेलले

अन नभामध्ध्ये नभ
खोल मिळाले मिसळले
जग तुझ्या माझ्यासाठी
आज बुडाले बुडाले

- योगेश ज जोशी

एक कविता कन्येसाठी
एक कविता कन्येसाठी….(अगदीच घरगुती वाटतंय?)

कन्या आली, खुदकन हसली, माझी नुसतीच लगबग

हात धरून म्हणाली, बाबा, पुन्हा आयुष्य माझ्यासवे बघ

मी चकित, मी धन्य, राहिलो पहातच असा एकटक

हरवून गेले, डोळ्यात एवढुशा, माझे चिकार चिकार जग…

आतून वरून आली
घेऊन मुठीत लाली
स्वागताला हातांच्या
गर्भरेशमी शाली…

आतून वरून आली
ओली रुजुता देहात
संगे नदीच घेऊन आले
पान हिरवे वहात

आतून वरून आली
भाग्य देई स्मितहास्य
ईश्वरीय प्रेमळ सत्तेचे
आता कळे रहस्य

आतून वरून आली
धन्य जीव इथे दोन
वाट पाहिली वाट पाहिली
प्राणांचे करून द्रोण

आतून वरून आली
मी पापणी आड चिंब
अष्टमीला राती आले
हे प्रियेचेच प्रतिबिंब

आतून वरून आली
सर्व काही शांत शांत
काठोकाठ समाधान फक्त
आता इथे दिशादिशांत

- योगेश ज जोशी

रिकाम्या जागा
आजकाल माझ्या कवितेत रिकाम्या जागाच फार

तशी बांधलेल्या अक्षरांची उडण्याची खोड जुनीच…

राहिली काही काळ जरी माझ्यापाशी

तरी ओढ त्यांना कायमच निळ्या आकाशाची

बागेतल्या फुलपाखराची, बोटीतल्या हेलकाव्यांची…

आतून आलेल्या हाकांनी,

निसर्ग जेव्हा हिरवा फुलतो,

ओल्या गवताच्या वासासकट…

तेव्हा ही अक्षरे त्याचे दव टिपायला जातात

छान कलत्या उन्हात जेव्हा,

डोंगर वेश बदलून येतात,

सांसारिकाच्या संध्याकाळसारखे…

तेव्हा ही अक्षरे त्यांची रात्र फुलवायला जातात

तिच्या मनची भोळी आठवण,

जेव्हा पापणी आडून ओघळते,

ओठात दाबल्या हुंदक्याला न जुमानता…

तेव्हा ही अक्षरे तिची गोष्ट पुरी करायला जातात

अशी ही आभाळवेडी अक्षरे आता

मुक्त शांतता देतात सगळ्या मनाला…

अत्तर उडून गेल्यावर भरजरी वस्त्राला

जाणवणाऱ्या मंद दरवळीसारखी…

ही माझी भूतकाळातून सुगंधी असणारी अक्षरे

ही बहुतेक कधीकाळी माझी असणारी अक्षरे

ही आता अशीच कुठे कुठे नांदायला गेलेली अक्षरे

आजकाल माझ्या कवितेत रिकाम्या जागाच फार !

- योगेश ज जोशी

मनकवडा
मन-कव-डा तू

अन कसा केवढा तू

माझी रुपेरी तेवढीच रात

माझा जेवढा तू

पोपटी हिरवळ

रानोमाळ दरवळ

आत आतल्या पानांचा

गंधित केवडा तू ————— १

कोवळी उन्हं

मोहरलं जिणं

घोर उन्हामध्ये ही

छाये एवढा तू  ——————२

मन-कव-डा तू

अन कसा केवढा तू

माझी रुपेरी तेवढीच रात

माझा जेवढा तू

- योगेश ज जोशी

विरून जाताना
ही गजल उरूदे मागे, मी विरुन जाताना

भले न भरतील डोळे, मन भरून जाताना

जे नडले मजला नेहमी, जगण्याच्यावेळी

मी शोक बघितला त्यांचा, मरुन जाताना

उद्दाम भाषा गेली उखडून महापुरामध्ये

ते पान होते नम्र झाले, तरून जाताना

धावले ते यशासाठी, घटका अन पळांच्या

जन्म मी समोर पाहिला; सरून जाताना

भान मलाही नाही उरले समर्पणाच्या रात्री

पाय तुझाही नाही अडला विस्मरुन जाताना

अर्थांचेच घोट घेतले, अर्थांचीच नशा आली

अर्थाचेच कण्हणे ऐकले, शब्द चिरुन जाताना

ही गजल उरूदे मागे, मी विरुन जाताना

भले न भरतील डोळे, मन भरून जाताना

- योगेश ज जोशी

राजकुमार
राजकुमार

मरणा आधी
पालवी नंतर;

डोळ्यांपाशी
चाफा फुलवत;

भुलवणारे
अत्तर घेऊन..

अश्व साथीने
त्या देशातून..

हळुच हळव्या
मखमलीतल्या-

किनऱ्या बुजऱ्या
सुखा सोबत

नात्यांना त्या
नाते करुनी

प्रिया बांवरी
हे ही स्मरुनी

भान जाणीव
अल्लद करण्या

उनाड जिवाला
शाश्वत करण्या

या अस्तित्वाला
जगणे करण्या

येशील?

येणारेस?

- योगेश ज जोशी